‘या’ आयुर्वेदिक चहाचे फायदे ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

Ayurvedic Tea Method | प्रत्येक भारतीयाची सकाळ ही एक कप कडक आणि गरमागरम चहाने होते. चहा म्हटलं की भरतीयांचं प्रेम आहे. प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीची चहा बनवली जाते. मात्र, अशी चहा आरोग्यासाठी फायदेशीर नसते. या लेखात तुम्हाला चहा बनवण्याच्या आरोग्यदायी पद्धतीबद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या रोजच्या चहामध्ये काही गोष्टींचा समावेश केला आणि तो बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला एक जबरदस्त चव तर मिळेलच शिवाय आरोग्याला अनेक फायदे देखील होतील. (Ayurvedic Tea Method)

चहा जास्त वेळ उकळू नका-

चहा घट्ट करण्यासाठी तो जास्त वेळ उकळला जातो. मात्र, यामुळे चहातील अँटिऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि त्यातून टॅनिन मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. हे आपल्या दातांसाठी आणि पोटासाठी चांगले नसते. त्यामुळे जास्त वेळ चहा उकळू नये.

साखर आणि गूळ टाळा-

शकतो चहामध्ये साखर आणि गूळ टाकू नये. आयुर्वेदानुसार चहामध्ये गूळ घालणे चांगले नाही.  याऐवजी आपण त्यात देशी खांड किंवा मिश्री घालू शकता. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय गोड चहाचा आनंद घेऊ शकता.(Ayurvedic Tea Method)

रिकाम्या पोटी चहा घेऊ नका-

सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा घेऊ नये. यामुळे अपचनासारखे पोटाचे विकार होऊ शकतात. चहामधील कॅफेनमुळे अनेकदा चिंताग्रस्त प्रवृत्तीत वाढ होऊ शकते तसेच अनियमित झोपेसारखे आजार ही उद्भवू शकतात. यामुळे दात पिवळे देखील पडतात.

चहामध्ये ‘या’ गोष्टी घाला-

लहान वेलची, लवंग, आले, दालचिनी, लिकोरिस, एका विशिष्ट जातीची बडीशेप आणि अर्जुनाची साल. यापैकी कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या चहामध्ये घालू शकता. या सर्व गोष्टी तुमच्या चहाची चव वाढवण्यास तसेच ते निरोगी बनविण्यात मदत करतात. अशी चहा तुम्हाला अनेक फायदे देईल.(Ayurvedic Tea Method)

अति जास्त सेवन घातक-

चहाचे सेवन नेहमी मर्यादेतच करा. तुम्ही कितीही आरोग्यदायी चहा तयार करत असलात तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आपल्या शरीरासाठी चांगला नाही. त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला चहासुद्धा अति जास्त सेवन करू नका.(Ayurvedic Tea Method)

News Title : Ayurvedic Tea Method
महत्त्वाच्या बातम्या-

“सोनाक्षी सिन्हाला धरावा लागणार रोजा?”; ‘ते’ फोटो शेअर करताच भडकले नेटकरी

शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; पुण्यातील बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

संतापजनक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाला ट्रेनच्या टॉयलेटमध्ये टाकून अज्ञात पालक पसार

कोथिंबीरच्या जुडीने खाल्ला भाव! एका जुडीची किंमत पाहून व्हाल थक्क

राज्यात आज मुसळधार! जाणून घ्या तुमच्या शहराला कोणता अलर्ट?