बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रामदेव बाबांना मोठा धक्का; कोरोना औषधाबाबत आयुष मंत्रालयाचे महत्त्वाचे आदेश

नवी दिल्ली | देशात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना रामदेव बाबा यांनी कोरोनावर पहिलं औषधं शोधून काढल्याचा दावा केला आहे. या औषधाद्वारे रूग्ण तीन दिवसांत बरा होणार असल्याचंही सांगण्यात आलं. मात्र केंद्रीय आयुष मंत्रालयानं या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

पतंजलीने या औषधाला ‘कोरोनिल’ असं नावंही दिल आहे. मात्र केंद्रीय आयुष मंत्रालयाने, जोपर्यंत या औषधाची योग्य पद्धतीने चाचणी होत नाही तोपर्यंत या औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिलेत.

आयुष मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने तयार केलेल्या कोरोनिल औषधाची दखल घेण्यात आली आहे. कंपनीने या औषधाची संपूर्ण माहिती द्यावी. तसंच क्लिनिकल ट्रायलचे अजून अहवाल आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण तपासणी होईपर्यंत या औषधाने कोरोना बरा होतो, अशी जाहिरात करू नये.

बाबा रामदेव यांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध बनवल्याचा दावा केला आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या औषधाबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत औषधाच्या चाचणीत सहभागी असलेले वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधकही उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातम्या-

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

आता लग्न आणखी ‘मंगल’ होणार, राज्य सरकारकडून या गोष्टीला परवानगी

महत्वाच्या बातम्या-

आमच्या औषधाने फक्त तीनच दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होणार; बाबा रामदेव यांचा दावा

जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

भारत-चीन सैन्य चकमक प्रकरणी अमेरिकन गुप्तचर विभागाची धक्कादायक माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More