मोठ्या मनाच्या मुस्लिमांनी ‘मुगल-ए-आझम’ला विरोध केला नव्हता!

लखनऊ | ‘मुगल ए आझम’ चित्रपटात दाखवण्यात आलेल्या गोष्टी इतिहासाशी मिळत्या-जुळत्या नव्हत्या, मात्र मुस्लीम समाज मोठ्या मनाचा असल्यानं चित्रपटाला विरोध केला नाही, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केलंय.

‘मुगल ए आझम’ चित्रपटात अनारकलीला सलीमची प्रेयसी दाखवण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात असं काही नव्हतं, त्यावेळी कोणत्याही मुस्लिमानं आक्षेप घेतला नाही. मुस्लीम समाज मोठ्या मनाचा आहे. एखादा चित्रपट इतिहास बिघडवू शकत नाही, असंही ते म्हणाले.

आझम खान यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.