देश

‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

नवी दिल्ली | लोकसभा उपाध्यक्ष रमा देवी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान यांनी रमा देवींची माफी मागितली आहे.

अध्यक्षांच्या भावना दुखावण्याचा यामागे माझा अजिबात हेतू नव्हता. तरीही माझ्याकडून काही चूक झाली आहे असं त्यांना वाटत असेल तर मी त्याबाबत क्षमा मागतो, असं आझम खान यांनी म्हटलं.

तुम्ही मला इतक्या चांगल्या वाटता की, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघतच राहावंसं वाटतं.  मला मुभा मिळाली तर मी कधी तुमच्यावरून नजर हटवणार नाही, असं आझम खान लोकसभेत बोलले होते. आझम खान यांनी या वक्तव्यासाठी माफी मागावी, अशी मागणी अनेक खासदारांनी केली होती.

दरम्यान, हा फक्त संसद सदस्याचा अपमान नसून लोकसभा अध्यक्षपदाचा अपमान आहे, असं रमा देवींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-…तर अजित पवारांनीच सर्वात पहिला भाजपमध्ये प्रवेश करायला हवा होता!

-येडियुरप्पांनी कर्नाटकमध्ये अखेर कमळ फुलवलं; बहुमत परीक्षणात पास

-बिचुकले इज बॅक; ‘या’ दिवशी घेणार बिग बॉसच्या घरात एन्ट्री

-राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

-…नाहीतर 288 जागा जाहीर करणार- प्रकाश आंबेडकर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या