बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अझीम प्रेमजींचं दर्यादिल… पाहा त्यांनी खरंच किती रक्कम मदत दिलीये

नवी दिल्ली | कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत. आभाळाएवढं मन असणाऱ्या अझीम प्रेमजी यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी 1125 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

परंतू, अझीम प्रेमजी यांनी मदत म्हणून दिलेली रक्कम हे पीएम केअर्स अंतर्गत दिले जाणार नाहीत. जगातल्या दानशूर व्यक्तींमध्ये अझीम प्रेमजी यांच नावं घेतलं जातं.

विप्रोकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रित 1125 रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा प्रेमजी फाऊंडेशनचा आहे. विप्रो लि. 100 कोटी, विप्रो इंटरप्रायजेस 25 कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन 1 हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहे.

ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सीएसआर निधी अंतर्गत दिला जाणार नाही. विप्रोने म्हटले की, कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या मानवी संकटाकडे पाहता विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन मिळून ११२५ कोटी रुपये खर्च करतील.

हे पैसे प्रभावित भागातील लोकांच्या मदतीसाठी, आरोग्य सुविधांवर आदींवर खर्च केले जातील. हा कार्यक्रम अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या 1600 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“कठीण काळात देखील पंतप्रधान मोदींनी केअर फंड उघडून प्रसिद्धीची संधी सोडली नाही”

अमेरिकेच्या नागरिकांना यावेळी नक्कीच लाज वाटत असेल; ट्रम्प यांच्यावर भडकली सोनम कपूर

महत्वाच्या बातम्या-

मास्क न लावल्याने महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल

दिल्लीमधील तबलीघींच्या मरकझमध्ये नेमकं काय चालतं???

खलनायक ठरलेले मौलाना साद कोण आहेत? त्यांना एवढा मान का? वाचा संपूर्ण माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More