Top News देश महाराष्ट्र मुंबई

“हा माणूस राजकारणामुळे हिंसेचे समर्थन करत आहे”

नवी दिल्ली | दिल्लीत झालेल्या शेतकरी आणि पोलीस यांच्यामधील चकमकीने प्रजासत्ताकदिनाला गालबोट लागलं.  या राड्यावर अनेक नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केंद्रावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष यांनी पवारांच्या टीकेवर पलटवार केला आहे.

हा माणूस अनेक दशकांपासून केंद्र सरकारमध्ये मंत्री होता. युक्तिवाद पाहा. राजकारणामुळे ते हिंसेचे समर्थन करत आहेत, असं बी एल संतोष यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

सुरुवातीला शांततेत आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने गंभीरपणे घेतलं नाही. संयम संपल्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी केंद्राची होती पण ते निष्क्रिय ठरलं असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं.

दरम्यान, दिल्लीतील घटनेचं समर्थन करता येणार नाही, पण ते का घडलं हे ही लक्षात घ्यायला हवं. अजूनही केंद्राने शहाणपण दाखवावा. टोकाची भूमिका सोडावी आणि अनुकूल निर्णय घ्यावा, असंही शरद पवार म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या- 

…अन् काहीतरी वेगळा डाव साधायचा, असा विचार केंद्र करत तर नाही ना- आदित्य ठाकरे

शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले….

दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल!

दिल्लीत शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?; समोर आला धक्कादायक व्हिडीओ

शीतल आमटेंचा विश्वासघात कुणी केला?; पती गौतम करजगींचे धक्कादायक आरोप

आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावरील तिरंग्याला धक्काही लावला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या