बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबा राम रहीमसह अन्य पाच साथीदारांना न्यायालयानं ठोठावली ‘ही’ मोठी शिक्षा

चंदिगड | डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीमला न्यायालयाकडून जोरदार झटका मिळाला आहे. सेवादार रणजितसिंह यांच्या हत्येप्रकरणी बाबा राम रहीमला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर आता न्यायालयानं बाबा राम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा दिली आहे.

बाबा राम रहिमच्या इतर पाच साथीदारांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयानं बाबा राम रहिमला 31 लाख तर आणि इतर चार आरोपींना प्रत्येकी 50 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयानं गुरमीत राम रहीम आणि त्याच्या अन्य साथीदारांना ही शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्याच्या अन्य साथीदारांना 8 ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज न्यायालयाकडून निकालाचं वाचन करून दाखवलं.

दरम्यान, बाबा राम रहीमला रणजितसिंह यांच्या हत्येप्रकरणात तसेच रामचंद्र छत्रपती यांच्यादेखील हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बाबा राम रहीमवर त्यांच्या अनुयायांवर बलात्कार केल्याचे देखील आरोप आहेत. तसेच या आरोपांखाली बाबा राम रहीम शिक्षा भोगत आहेत.

थोडक्यात बातम्या –

काय सांगता! विमानाच्या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षाही स्वस्त; काय आहे कारण?

‘मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर…’; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

“वाॅण्टेड असलेल्या गृहमंत्र्यांना पण समोर येऊन उत्तर द्यायचं आवाहन करा”

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांनो सावधान, जडत आहे ‘हा’ विशिष्ट आजार

विराट कोहलीची नजर ‘या’ विक्रमावर! भारत-पाकिस्तान सामन्यात करू शकतो कमाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More