बाबा रामदेव यांनी नाव बदललं, आता म्हणा “स्वामी रामदेव”!

Photo- twitter/yogrishiramdev

नवी दिल्ली | पतंजलीचे सर्वेसर्वा आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी आपल्या नावामध्ये थोडासा बदल केलाय. आपल्या नावातून बाबा काढून त्यांनी आता स्वामी रामदेव असं नाव धारण केलंय. 

बाबा रामदेव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरील नावं नुकतीच बदलली, तसेच सोशल मीडिया अकाऊंट्सचे यूझरनेमही बदलले आहेत. त्यानंतर हा प्रकार लक्षात आला. 

दरम्यान, बाबा रामदेव यांनी आपल्या नावात हा बदल का केला ते अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र बाबा नावापेक्षा स्वामी शब्दाला जास्त वजन असल्याने त्यांनी हा बदल केला असण्याची शक्यता आहे. 

Photo- Swami Ramdev Facebook Screengrab