Loading...

राम मंदिरासाठी शासनाने कायदा करावा अन्यथा जनताच राम मंदिर बनवेल- रामदेव बाबा

नांदेड | राम मंदिर बनवण्यासाठी शासनाने कायदा केला पाहिजे. असं झालं नाही तर जनताच राम मंदिर बनवेल, असं योगगुरु बाबा रामदेव म्हणाले आहेत. नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राम मंदिर हा भारतीय जनतेच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. तो कोणताही राजकीय प्रश्न नाही. राम मंदिर होणारच आणि रामासारखे देशाचे चरित्रही बनेल, असा विश्वास बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

राम मंदिर अयोध्येत उभारावे अशी आमची श्रद्धा आहे. राम मंदिर हे आम्ही मक्केत किंवा व्हॅटीकनसिटीमध्ये बांधा असं म्हणत नाही, असंही रामदेव बाबांनी सांगितलं आहे.

श्रीराम हे प्रत्येक नागरिकाचे पूर्वज आहेत. ते हिंदूंचे आणि मुस्लिमांचेही पूर्वज आहेत. हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकच असल्याचंही रामदेव बाबा म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींच्या नावाने सात-बारा; शासनाचा निर्णय

-चंद्राबाबूंना मोठा धक्का; 4 खासदार भाजपच्या वाटेवर

-‘या’ अभिनेत्रीवर हल्ल्या; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश

Loading...

-..नाहीतर खासदारकी रद्द होणार; सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे अडचणीत

-सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक; मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

Loading...