मुंबई | कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना देखील होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो, असं बाबा रामदेव म्हणाले.
कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोरोनाशी घाबरुन राहण्याची गरज नाही. ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहेत आणि ते योगही करतात. याशिवाय ज्यांना गरज आहे त्यांनी लस जरुर घ्यावी. बाकी जे सरकार आणि औषध कंपन्या करतील त्याचे परिणाम लवकरच समोर येणार असल्याचं रामदेव बाबा म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“‘त्या’ मध्यरात्री मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता…’; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितली अंदर की बात
“थोरातांना टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजीराजांचा इतिहास कळणार नाही”
औरंगाबादच्या नामंतरावरून ठाकरे सरकारमधील विरोधाभासावर अजित पवाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
“औरंगाबादच्या नामांतराच्या वादातून ठाकरे सरकार कोसळणार”