”फक्त नमाज पढा, मग तुम्हाला जे हवं ते करा… मुस्लिमांना हेच शिकवलं जातं”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | हल्ली राजकारण्यासोबतच बाबा-महाराजांनी देखील वादग्रस्त विधानांचा पाढा सुरु केला आहे. तुकाराम महाराज्याबद्दल वादग्रस्त विधान केलेल्या बागेश्वर महाराजाचं प्रकरण निवळत असतानाच पुन्हा एक वाद सुरु झाला आहे. योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी मुस्लिमधर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

राजस्थानच्या (Rajasthan) बाडमेर जिल्ह्यांतील एका धार्मिक मेळाव्यात बाबा रामदेव यांनी हे विधान केलं आहे.फक्त नमाज पढा, मग तुम्हाला जे हवं ते करा.हिंदू मूलींना पळवून आणा किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी व्हा, तुमच्या मनाच जे येत तेच करा,मुस्लिमांना हेच शिकवलं जातं. असं विधान त्यांनी केलं आहे.

रामदेव एवढंच बोलून न थांबता त्यांनी ख्रिश्चन (Christian) धर्मावरदेखील टिका केली आहे. चर्च मध्ये जा मेणबत्ती लावा, सगळे पाप धुतले जातात. हिंदू धर्मात असं काही होत नाही. मुस्लिमांची जन्नत म्हणजे घोट्याच्या वर पायजमा घालणे, मिश्या कापणं आणि टोपी घालणं इतकीच आहे. असंही ते पुढे म्हणाले.

सनातन धर्मात असं काही नसतं. सनातन धर्मात सांगितलं आहे लवकर उठा. ईश्वराचे ध्यान करा. योग करा. जप करा. इतरांची सेवा करा. देवाने फक्त माणूस बनवला आहे. माणसाने धर्म-जाती सुरु केल्या आहेत. मी कोणावरही टिका करत नाही पण, लोकांकडे धर्मातर करण्याचा अजेंडा नाही आहे. असं ते म्हणाले. दरम्यान, त्यांच्या या विधानामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या