बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन?, आणखी एका आरोपीला अटक

Baba Siddique | माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणी आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार आहेत. अशात फेसबुक पोस्ट करणाऱ्या  शुब्बू लोणकर नामक एका संशयित आरोपीच्या भावाला पुण्यात अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर असं या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. (Baba Siddique)

दोघे भाऊ या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचं म्हटलं जातंय. गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट  शुब्बू लोणकर महाराष्ट्र या फेसबूक पेजवरून शेअर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.  शुब्बू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती नंतर उघड झाली.

पुण्यातून एका संशयित आरोपीच्या भावाला अटक

या दरम्यान पोलीस अकोट येथे दाखल झाले. मात्र, घराला कुलूप आढळून आले. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर पोलिसांनी पुण्यातील घरी छापा टाकला. यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. तसेच पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी होते, अशी शंका पोलिसांना आहे. (Baba Siddique)

दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं

या घटनेप्रकरणी आता पर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. वांद्रे येथून दोन जणांना अटक करण्यात आली. तर, पुण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप असं आधी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. (Baba Siddique)

गुरुमीत सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गुरुमीत सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, धर्मराज कश्यपला हाडासंदर्भातील एक चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आरोपी धर्मराज कश्यपचे वय कोर्टात 17 वर्षे सांगण्यात आले आहे.

News Title : Baba Siddique murder case one arrested from Pune

महत्वाच्या बातम्या-

आज सोमवार, महादेवाची ‘या’ राशींवर असणार कृपादृष्टी!

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरबाबत धक्कादायक माहिती समोर!

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर गँगस्टर रोहित गोदाराचं वक्तव्य चर्चेत!

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील तिसरा आरोपी पुण्यात करत होता नोकरी!

‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ