बाबा सिद्दिकी हत्येनंतर भाजप नेत्याचा सलमान खानला मोठा सल्ला; थेट म्हणाले..

Baba Siddiqui Murder Case | राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस याचा अधिकचा तपास करत आहेत. या हत्याप्रकरणामागे बिश्नोई गँगचा (Lawrence Bishnoi Gang) हात असल्याचं सांगितलं जात आहे. इतकंच नाही तर, बॉलीवूड अभिनेता सलमान खानशी (Salman Khan) जवळीक असल्यानं बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याचं देखील म्हटलं जातंय. (Baba Siddiqui Murder Case)

अशात भाजपच्या एका नेत्याने सलमान खानला एक महत्वाचा सल्ला दिला आहे. माजी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते हरनाथ सिंह यादव (Harnath Singh Yadav) यांनी सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागा, असा सल्ला दिला आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे. त्यामुळे सध्या ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला

“बिश्नोई समाज काळविटाला देव मानतो आणि त्यांची पूजा करतो. पण, तुम्ही त्याची शिकार केली, त्यामुळे बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करत आपल्या मोठ्या चुकांबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागितली पाहिजे.”, असं या पोस्टमध्ये भाजप नेते हरनाथ सिंह यांनी लिहिलं आहे. ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई गँगनेच सिद्दिकींची हत्या केल्याचं आता उघड झालं आहे. कारण, शुब्बू लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Baba Siddiqui Murder Case)

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी तिघांना अटक

पोलिसांनी या घटनेप्रकरणी आता पर्यंत 3 जणांना अटक केली आहे. वांद्रे येथून दोन जणांना अटक करण्यात आली. तर, पुण्यातून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप असं आधी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. गुरुमीत सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गुरुमीत सिंगला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, धर्मराज कश्यपला हाडासंदर्भातील एक चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, आरोपी धर्मराज कश्यपचे वय कोर्टात 17 वर्षे सांगण्यात आले आहे. (Baba Siddique)

अभिनेता सलमान खान हा देखील बऱ्याच काळापासून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्पशुटर्सनी बऱ्याचदा सलमान खानची रेकी देखील केल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी पहिली रेकी रेडी चित्रपटादरम्यान झाली होती. तर, दुसऱ्यांदा पनवेलच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती. इतकंच नाही तर, सलमानच्या घरावर आतापर्यंत तीनवेळा गोळीबार देखील करण्यात आला आहे. (Baba Siddiqui Murder Case)

News Title :  Baba Siddiqui Murder Case BJP leader advice to Salman Khan

महत्वाच्या बातम्या-

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन?, आणखी एका आरोपीला अटक

आज सोमवार, महादेवाची ‘या’ राशींवर असणार कृपादृष्टी!

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरबाबत धक्कादायक माहिती समोर!

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर गँगस्टर रोहित गोदाराचं वक्तव्य चर्चेत!

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणातील तिसरा आरोपी पुण्यात करत होता नोकरी!