Baba Siddiqui Murder Case | राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामागे आता बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणानंतर शुब्बू लोणकर नामक व्यक्तीच्या अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस आता यासंदर्भात तपास करत आहेत. (Baba Siddiqui Murder Case)
अशात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील चर्चेत आले आहेत. कारण, काही महिन्यांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांना देखील धमकी देण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या याच बिश्नोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांनाही धोका असल्याची यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे. मात्र, आव्हाड यांच्या सुरक्षेत अद्यापही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये.
जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता आव्हाड यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, आव्हाड यांच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आव्हाड यांची सुरक्षा वाढवली नाही तर, आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे पदाधिकारी हेमंत वाणी यांनी दिला आहे. (Baba Siddiqui Murder Case)
इतकंच नाही तर, सलमान खानला देखील या गँगकडून धोका असल्याची चर्चा रंगू लागली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शार्पशुटर्सनी बऱ्याचदा सलमान खानची रेकी देखील केल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी पहिली रेकी रेडी चित्रपटादरम्यान झाली होती. तर, दुसऱ्यांदा पनवेलच्या फार्म हाऊसची रेकी करण्यात आली होती. तसेच, सलमानच्या घरावर आतापर्यंत तीनवेळा गोळीबार देखील करण्यात आला आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाही
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप अशी दोन आरोपींची नावे आहेत. यापैकी धर्मराज कश्यप अल्पवयीन असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला होता. आरोपी धर्मराज कश्यपचे वय 17 वर्षे सांगण्यात आलं होतं. यासाठी आरोपीची ऑसिफिकेशन चाचणी करण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.
आरोपी धर्मराज कश्यप याची ऑसिफिकेशन टेस्ट करण्यात आली. वय निश्चित करण्यासाठी ही एक प्रकारची हाडांची चाचणी आहे. या चाचणीचा अहवाल समोर आला आहे. यामध्ये आरोपी धर्मराज कश्यप हा अल्पवयीन नाही हे सिद्ध झालं आहे. चाचणीचा अहवाल आल्यानंतर आरोपी धर्मराज कश्यपला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला कोर्टाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Baba Siddiqui Murder Case)
News Title : Baba Siddiqui Murder Case Demand for jitendra awhad security
महत्वाच्या बातम्या-
बाबा सिद्दिकी हत्येनंतर भाजप नेत्याचा सलमान खानला मोठा सल्ला; थेट म्हणाले..
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन?, आणखी एका आरोपीला अटक
आज सोमवार, महादेवाची ‘या’ राशींवर असणार कृपादृष्टी!
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या शुटरबाबत धक्कादायक माहिती समोर!
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर गँगस्टर रोहित गोदाराचं वक्तव्य चर्चेत!