बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ! ‘या’ आमदाराने दिला पदाचा राजीनामा

परभणी | महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजवून देणाऱ्या अनेक घटना घडत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यातच मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला असल्याचं समोर आल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

परभणी जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व पाथरी मतदारसंघाचे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळवलं आहे. तसेच अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे जिल्हाभरात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बाबाजानी दुर्राणी यांना काही दिवसांपुर्वी एका इसमाने मारहाण केली होती. त्यानंतर या घटनेचा निषेध म्हणून बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांनी पाथरीसह संपुर्ण जिल्ह्यात बंद पुकारला होता. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी यांच्यासह समर्थकांकडून आरोपी मोहम्मद बिन सईद याला हद्दपार करण्यात यावं, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

घटनेलाए एक आठवडा उलटल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने बाबाजानी हे नाराज होते. त्यातच आज त्यांनी जयंत पाटील यांनी फोनवरून आपल्या राजीनाम्याबद्दल सांगितलं आहे. तर आता राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. तसेच त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झाला नसून पक्षश्रेष्ठी यात काही मार्ग काढणार का?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

थोडक्यात बातम्या

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

काय सांगता! आता चक्क रेल्वेच मिळणार भाड्याने; रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली ‘ही’ नवी योजना

देशातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत तज्ज्ञांनी केलं मोठं विधान, म्हणाले…

मोठी बातमी! माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला जीेवे मारण्याची धमकी, सुरक्षा वाढवली

“तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More