अजितदादांना झटका! बड्या नेत्याची शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

Babajani Durrani | लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठं अपयश मिळालं. त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला. तर, शरद पवार गटाने अनेक जागांवर बाजी मारत विजयी गुलाल उधळला.लोकसभेच्या निकालानंतर बऱ्याच नेत्यांची शरद पवार गटात इनकमिंग सुरू आहे. तर, काही नेते पुन्हा घरवापसी करत आहेत.अशात अजित दादांना मोठा झटका बसला आहे. कारण, एका बड्या नेत्याने (Babajani Durrani) त्यांची साथ सोडली आहे.

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार महायुतीला धक्क्यावर धक्के देत आहेत. बऱ्याच नेत्यांची ठाकरे गटात देखील घरवापसी झाली आहे. अशात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष असलेले बाबाजानी दुर्राणी यांची पुन्हा घरवापसी होणार आहे.

बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात प्रवेश करणार

ते राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात (Sharad Pawar Group) जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत.आज दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.

“आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे आदरणीय माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर येथे पवार साहेबांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षात माझा प्रवेश होणार आहे.”, असं ट्वीट बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी केलं आहे.

“भाजपसोबत असलेल्या पक्षांना मुस्लीम मतदार नाकारत आहेत”

यावेळी बाबाजानी दुर्राणी यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक खुलासे देखील केले. “मला कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विचारसरणीच्या आधारावर मी हा निर्णय घेतलाय. सबंध देशात मुस्लीम समाजाची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. भाजपात असलेल्या पक्षांना मुस्लीम मतदार मतदान करायला तयार नाहीत. त्यामुळे मी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहे.”, असं बाबाजानी दुर्राणी म्हणाले आहेत.

तसेच, मी ग्राऊंडवरचा कार्यकर्ता आहे. नेहमी धर्मनिरपेक्ष विचारानेच मी काम केलं आहे. अजित पवार फुले-शाहू-आंबेडकरी विचाराने काम करत आहेत. पण, त्यांच्यासोबत दोन पक्ष असल्याने अल्पसंख्याक विचारांच्या कार्यकर्त्यांसाठी काम करणं अवघड झालंय, असं बाबाजानी दुर्राणी(Babajani Durrani) म्हणाले आहेत.

News Title : Babajani Durrani will join Sharad Pawar group  

महत्त्वाच्या बातम्या-

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ होणार!

नवी मुंबईत 3 मजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती

या आठवड्यात सोन्याचा मोठा दिलासा; 10 ग्रॅम सोनं फक्त..

दिग्दर्शक फराह खानला मातृशोक, मेनका इराणी यांचं निधन

अनेक महिने वापरताय एकच टूथब्रश?, मग ही बातमी वाचाच