माढा | तालुक्यातील जनतेने परिवर्तनाचा निर्णय घेतलाय. मागील 25 वर्षात कधीही घडले नाही ते घडत आहे. प्रथमच लढत एकास एक होत आहे. आता परिवर्तन अटळ आहे. संजय कोकाटेंचा विजय पक्का आहे, असं कृषी मुल्य आयोगाचे सदस्य सुहास पाटील म्हणाले आहेत.
भाजप- सेना युतीचे उमेदवार संजय कोकाटे यांच्या प्रचारानिमित्त लऊळ, उजनी, भेंड आणि अरण या गावात कॉर्नर सभा पार पडल्या. या सभेत सुहास पाटील बोलत होते.
माढ्याच्या विद्यमान आमदारांनी 25 वर्षात एकही कार्यकर्ता आर्थिक तसंच राजकीयदृष्या सक्षम करू शकले नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना लंगडं करून ठेवलं आहे, अशी टीका सुहास पाटील यांनी केली आहे.
25 वर्ष आमदार असूनही केलेल्या कामांवर मतं मागण्याचं धाडस त्यांच्यात नाही. आणखीही आम्ही हे करू शकतो. ते करू शकतो, असं म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम विद्यमान आमदार शिंदे करत आहेत. प्रत्येक निवडणुकीला एकसारखीच आश्वासनं ते देत आहेत, ही खरं तर शोकांतिका आहे, अशी टीका कोकाटे यांनी शिंदे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदेंना मनसेची साथ https://t.co/c9LkwgliL0 @shindespeaks @mnsadhikrut #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
…त्या दिवशी अजित पवारांनी राजीनामा द्यायची काहीच गरज नव्हती- छगन भुजबळ https://t.co/cz4WitqSFv @AjitPawarSpeaks @NCPspeaks @ChhaganCBhujbal #AssemblyElections2019
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
मराठमोळ्या सौरभ अंबुरेंना मिळाला पहिलं राफेल उडवण्याचा मान!- https://t.co/QSkVuzesQ7 #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 15, 2019
Comments are closed.