Babanrao Lonikar | राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मोठा वाद पेटला आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा काही दिवसांचा अवधी देत मोठा इशारा दिलाय. दुसरीकडे ओबीसीकडूनही त्यांच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी जोर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर महायुती सरकार विरोधकांची मते जाणून घेण्यास प्रधान्य देत असल्याचं दिसून येतंय.
दोनच दिवसांपुर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आरक्षण प्रश्नी चर्चेसाठी राजी केलंय. शरद पवार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या संदर्भात भेट घेणार आहेत.अशात भाजपच्या एका नेत्याने ( Babanrao Lonikar ) थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय.
“मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान..”
परतूर येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर ( Babanrao Lonikar ) बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली. मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारा बेईमान नेता शरद पवार असल्याची टीका बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
इतकंच नाही तर, त्यांच्यापुढे शकुनी मामा देखील फेल असल्याचं लोणीकर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही जोरदार टीका केली. “शरद पवार यांच्यासमोर शकुनी मामाही फेल आहे. शरद पवार जिवंत आहेत ना..? काय हाल आहेत..एका हाताने करायचे आणि एका हाताने फेडायचे.”, अशी टीका लोणीकर यांनी केली.
“शिवसेनावाले बेबनाव करत आहे”
“आपल्या सरकारने आरक्षण दिलं. मराठा आरक्षणाचा फायदा मुलांना शिक्षणात होऊ लागला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेले. आरक्षणाची केस होती, तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल वकील दिले. अतिरेक्यांचा जामीन घेणारा, राम मंदिराला विरोध करणारा वकील दिला आणि त्यांनी आरक्षण घालवले.”, असा जोरदार प्रहार लोणीकर ( Babanrao Lonikar ) यांनी केला.
तसंच पुढे ते म्हणाले की, “काँग्रेसवाले बेईमान आहेत, राष्ट्रवादीवाले हरामखोर आहेत. हे साले शिवसेनावाले बेबनाव करत आहेत. या लोकांच्या बहकाव्यात येऊ नका. हे लोक ओबीसी आणि मराठा भांडण लावत आहेत.”, असा आरोप देखील बबनराव लोणीकर यांनी केला.
News Title – Babanrao Lonikar Criticised Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या-
बेरोजगार तरुणांना मिळणार दरमहा 10 हजार, ‘लाडका भाऊ योजने’साठी ‘असा’ करा अर्ज
अजितदादा गटातील तब्बल ‘इतके’ नगरसेवक शरद पवार गटात जाणार; यादी आली समोर
“थोडी तरी लाज असेल तर नरेंद्र मोदींनी..”; काश्मीरमधील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
अशा महिलांपासून राहा लांब, नाहीतर व्हाल बर्बाद