मुंबई | वीजबिलामध्ये सवलत मिळेल असं सांगणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोणतीही सवलत मिळणार नाही असे सांगितले. महाराष्ट्र सरकारचा हा निर्लज्जपणा आहे, अशी टीका भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे.
विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हक्कभंग आणणार असल्याची माहितीही बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
विद्यमान महाविकास आघाडी सरकारची नितीमत्ता जनतेच्या हिताची नाही. महाविकास आघाडी सरकारचा खोटारडा आणि निर्लज्ज चेहरा यानिमित्ताने सर्वसामान्य जनतेसमोर आला आहे, अशी टीका लोणीकर यांनी केली.
दरम्यान, वीजबिलामध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. वीजबिल भरलेले नसल्यास तत्काळ वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“अख्खा दिवस गेला पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट किंवा मसेजही दिसला नाही”
योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु
राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत
“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”
मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे