“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. जरांगे यांनी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला काही दिवसांचा अवधी दिला आहे. या वेळेत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर, थेट विधानसभेसाठी तयारी करू असा इशाराच त्यांनी दिलाय. दुसरीकडे ओबीसी कडूनदेखील मागे उपोषण करण्यात आलं होतं. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागलं आहे.

अशात जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी टीका केली आहे. त्यांनी जरांगे यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, लोकांचा किती पाठिंबा मिळतो हे एकदाच स्पष्ट होऊन जाईल, असा उपरोधिक टोला लगावला आहे.

बबनराव तायवाडे यांचं मोठं वक्तव्य

“राज्य सरकारने आता मनोज जरांगे पाटील यांना स्पष्ट सांगण्याची वेळ अली आहे. पण, त्यांना राज्य सरकार स्पष्ट सांगत नाही म्हणून तर अडचण आहे. राज्य सरकारने तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे, त्यांच्याकडून कायदेशीर मत घेऊन राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत हे आता स्पष्ट सांगायला हवं.”, असं बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.

दरम्यान, जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चिती करण्याची मागणी केली आहे. यावर देखील तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जरांगे यांच्या वेगवेगळ्या मागण्या असल्या तरी मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चितीकरणाची मागणी पूर्ण करणे शक्य नाही, हे आता राज्य सरकारने त्यांना सांगायला हवं.”, असं बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी म्हटलंय.

“मातृसत्ताक पद्धतीने जात निश्चितीची मागणी पूर्ण करणे अशक्य”

पुढे ते म्हणाले की, “सामाजिक प्रश्नावर आंदोलनसाठी कोटींनी लोक सोबत येतात. मात्र राजकीय प्रश्नावर लोकांची भूमिका वेगवेगळी असते. त्यामुळे मनोज जरांगे यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदा कळून जाईल की, त्यांना किती पाठिंबा मिळतो.”, असा टोला देखील तायवाडे यांनी लगावला आहे.

दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा मोठा इशारा दिला आहे. “आम्ही कोणाच्या फायद्यासाठी काम करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे. आम्ही आमची शक्ती दाखवतो.”, असं जरांगे (Manoj Jarange) म्हणाले आहेत.

News Title –  Babanrao Taywade on Manoj Jarange

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार?; ‘त्या’ नेत्यांची पुन्हा शरद पवारांकडे वाटचाल?

“छगन भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत”; जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

कार खरेदी करायचीयं? तर येत्या काळात तुमच्यासमोर आहेत ‘हे’ बेस्ट ऑप्शन

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

आज ‘या’ 2 राशींचे नशीब पालटणार!