बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टी-20 विश्वचषकाआधी या खेळाडूची सर्व संघांना धास्ती; गेल, विराटला मागे टाकत केलाय ‘हा’ भीम पराक्रम!

मुंबई | येत्या 17 ऑक्टोबर पासून टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक ओमान आणि युएईमध्ये होत आहे. त्यामुळे या विश्वचषकाची प्रतिक्षा जगभरातील चाहते करत आहेत. अशातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत टी-20 प्रकारामध्ये नवा विक्रम रचला आहे.

पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या राष्ट्रीय टी-20 स्पर्धेत बाबर आझम हा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यावेळी त्याने 49 चेंडूत 59 धावा केल्या. त्यामुळे बाबर आझमने टी-20 क्रिकेटमध्ये 187 डावात 7 हजार करणारा तो जगातील सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे.

क्रिकेटमध्ये ‘युनिव्हर्सल बाॅस’ म्हणून ओळख असलेला ख्रिस गेलने 192 डावात आणि विराट कोहलीने 212 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. बाबरने टी-20 प्रकारातील 196 सामन्यात 6 दमदार शतक आणि 59 अर्धशतक ठोकली आहेत. तर टी-20 मधील बाबर आझमची 122 धावाची सर्वोत्तम खेळी आहे. बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकलं आहे.

दरम्यान, बाबर आझमने वेगवान सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत, परंतु सर्वात वेगवान 3 हजार आणि 4 हजार धावा करणारा आशियाई फलंदाज देखील बाबर आझम ठरला आहे. भारताच्या विरोट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि शिखर धवन या खेळाडूंनी टी-20 मध्ये चार हजार धावांचा टप्पा पुर्ण केला आहे.

ANOTHER RECORD FOR @babarazam258 👏👏👏 pic.twitter.com/jeHjUBRKh8

थोडक्यात बातम्या-

ब्रेकिंग | पुण्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची हजेरी

आर्यनला ज्या पार्टीतून उचललं ‘त्या’ पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ!

मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे किंग खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

”घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा”

‘आता वेळ आली आहे, मी लखीमपूर खेरी येथे जाणार’; असदुद्दीन औवेसी आक्रमक!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More