बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज शंभरावं वर्ष लागतंय, आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही- बाबासाहेब पुरंदरे

मुंबई | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज 99 वा वाढदिवस आहे. आज ते 100 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. शंभरावं वर्ष लागतंय. कदाचित विधात्याची ही इच्छा असावी. या काळात मी खूप शिकलो. शिकवण्याचा आव मी कधी आणला नाही, असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.

मी खरंतर वेगळं असं काही केलं नाही. मला कसलंही व्यसन नाही इतकंच. आणखी किती वर्षे जगणार माहिती नाही. अजून दोन ते तीन वर्षे मिळाली तर इतकंच मागतो की मला आजारी पडू देऊ नकोस. पुढील आयुष्य मिळालं तर छान हसत-खेळत स्वावलंबी असावं, असंही ते म्हणालेत.

वयाच्या 99 वर्षांमध्ये मी आनंदी आहे. पण समाधानी आणि तृप्त नाही. प्रकृतीने साथ दिली तर खूप काही लिहायची इच्छा आहे. सर्वांना रायगडावर घेऊन जायचं आहे, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या सोहळ्याचं आयोजन टाळत त्यांच्या वाढदिवसानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. बाबासाहेब पुरंदरे शंभरीत पदार्पण करीत असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

थोडक्यात बातम्या-

‘बँक बुडाली तर…’; अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

घराबाहेर पडत असाल तर सावधान; पुढील 3 दिवस ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; ठोठावला ‘इतक्या’ लाखांचा दंड

“पेगॅससची चौकशी केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं”

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची हॅट्रिक; उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More