पुतळे उभारणे आणि त्यांच्या उंचीवरून भांडण्यातच आपल्याला समाधान- बाबासाहेब पुरंदरे

पुतळे उभारणे आणि त्यांच्या उंचीवरून भांडण्यातच आपल्याला समाधान- बाबासाहेब पुरंदरे

मुंबई | रोजच्या जीवनात हताश झालेल्यांसाठी गड-किल्ले प्रेरणास्त्रोत ठरू शकतात. मात्र पुतळे उभारण्याची स्पर्धा आणि पुतळ्याच्या उंचीवरून भांडणे करण्यातच आपण समाधान मानतो, अशी खंत बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. ते एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते. 

युवा पिढीत राष्ट्रीय चारित्र्याचे बीजारोपण करण्यात आपण कमी पडलोय, असं त्यांनी सांगितलं.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाचे वाचन आणि सखोल अभ्यास करणे योग्य ठरेल, असं पुरंदरेंनी म्हटलं.

दरम्यान, या इतिहासावरून आपल्याला शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येईल, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-शिवरायांच्या महाराष्ट्राच्या अधोगतीची सुरुवात; सामनातून भाजपवर निशाणा

-…तर दानवेंचा लंगोटही शिल्लक राहणार नाही- बच्चू कडू

-आबा तिकडं तिकीट मिळत नसेल तर इकडं या; रामदास आठवलेंचं आमंत्रण

-… म्हणून नवनीत कौर राणांनी दिलं मुख्यमंत्र्यांना निवेदन!

-काय सांगता??? अवघ्या 49 हजार रुपयांमध्ये मिळतोय आयफोन X

Google+ Linkedin