डॉ. बाबासाहेबांचं स्मारक 2020 पर्यंत पुर्ण करू- मुख्यमंत्री

नागपूर | मुंबईतील चैतन्यभुमीजवळ डॉ. बाबासाहेबांचे भव्यस्मारक 2020 पर्यंत पुर्ण करू, असं अश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. ते नागपुरातील एका कार्यक्रमात बोलत होते.

बाबासाहेबांच्या स्मारकासाठी अनेक वर्ष इंदू मिलची जागा मिळत नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन हजार कोटींची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली आहे. त्यावर कामही सुरु झालं आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

बाबसाहेबांनी जगातील सर्वोत्तम संविधान दिलं आहे. आमचं सरकार चालेल ते फक्त संविधानानुसारच, अशी हमीही त्यांनी यावेळी दिली. 

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील विविध बुद्धिस्ट पर्यटन स्थळांच्या विकासासाठी 40 कोटींचा निधीही मुख्यमंत्र्यांनी जाहिर केला. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपला मोठा धक्का; अवघ्या 3 महिन्यात या नेत्याचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

-अभिनेता सलमान खान साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?

-जानकरसाहेब, आता माझ्या नवऱ्यालाही रासपमध्ये घ्यायला हरकत नाही- प्रीतम मुंडे

-मोदींना भेटण्याचा हट्ट धरणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं

-बताओ कौनसा प्राणी?; खासदार संजय राऊतांना एका साधूचं कोडं

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या