बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ महिन्यापासून लहान मुलांना मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने देशभर थैमान घातलं होतं. त्यामुळे देशभरात लसीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत होती. त्यानंतर आता कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत आहे. पण कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता लहान मुलांना देखील लसीकरण करण्याची गरज भासू लागली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लवकर लहान मुलांचं लसीकरण होणार असल्याचं सांगितलं आहे. येत्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्यानं लहान मुलाचे पुढील महिन्यापासून लसीकरण करण्यात येणार आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणासाठी झायकोव्ह डी, कोव्हाॅक्सिन आणि फायझर या तीन लसींना लवकर मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

झायकोव्ह डी या लसीच्या सर्व चाचण्या पुर्ण झाल्या आहेत. पण या लसीला आपात्कालिन वापरासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या लसीला लवकरच परवानगी मिळू शकते. भारत बायोटेकच्या कोव्हाॅक्सिन लसीच्या सध्या चाचण्या चालू आहेत. सप्टेंबरपर्यंत चाचण्या पुर्ण होणार आहेत. त्यानंतरच याला परवानगी मिळणार आहे.

दरम्यान, अमेरिकेत लहान मुलांच्या लसीकरणासाठी फायझर लसीला परवानगी दिली आहे. तर या कंपनीने भारतात देखील अर्ज केला आहे. परंतू याला अद्याप मंजूरी देण्यात आली नाही. आता लहान मुलांचे लसीकरण करण्यात येणार असल्यानं फायझरला लवकरच परवानगी मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

‘भारत जातीवादाने नाही तर वर्णभेदानेही बाधित आहे’; मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली

धक्कादायक! पुणे नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड, पालिकेच्या पैशांवर सुरू आहेत ‘ही’ कामे

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More