बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंगलकार्यालयात बॉयफ्रेंडचं लग्न सुरु, बाबू- बाबू म्हणत गर्लफ्रेंडचा गेटवर आक्रोश

नवी दिल्ली | सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. या तरुणीनं आपल्या प्रियकराच्या लग्नसमारंभात पोहोचून एकच गोंधळ केला. लग्नामंडपाच्या गेटवर बाबू-शोना करुन ही तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला बोलवण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. ही घटना होशंगाबाद शहरातील आहे.

व्हिडीओत जोर-जोरात गेट वाजून ती आपल्या प्रियकराला हाक मारताना दिसतेय. या तरुणीचा हा ड्रामा अर्धा तास सुरु होता, पण उपस्थित असलेली मंडळी तिला लग्नमंडपात जाण्यापासून थांबवताना दिसली.

या घटनेची माहिती मिळताच कोवताली ठाण्यातील महिला एसआय श्रद्धा राजपूत आणि पोलीस मॅरेज गार्डनजवळ पोहोचले. त्यांनी तरुणीला गाडीमध्ये बसवलं आणि या सर्वाचं कारण विचारलं. यावर तिचा प्रियकर आणि ती तीन वर्षांपासून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. आता तिच्या प्रियकरानं तिला काहीही कल्पना न देता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचं या तरुणीनं पोलिसांनी सांगितलं.

कारवाई करायची असेल तर तक्रार कर, असं पोलिसांनी तरूणीला सांगितलं. मात्र तिने कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यास नकार दिला. नंतर ही तरूणी भोपाळला परत गेली. ही तरुणी कानपूरची रहिवासी आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘रोज एक कॉफी प्यायल्यास…’; संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

“राहुल गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारण पूर्ण होत नाही”

“समझोताच करायचा नसेल, सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…”

“राहुल गांधी जिंदाबाद घोषणा दिल्यावर माणसाचं सोडा बैलालाही ते सहन झाले नसावं”

गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार’; बैलगाडीवरुन कोसळलेल्या काँग्रेस नेत्यांना प्रसाद लाड यांचा खोचक टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More