कुठलाच प्रचार केला नाही, तरी तिसरी पास सालगड्याला पडली लाखभर मतं

Loksabha Result l लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर झाला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा झाल्याचे चित्र दिसत आहे. अशातच या निवडणुकीदरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एक रंजक घटना घडली आहे.

कोण आहेत बाबू सदू भगरे? :

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात इयत्ता तिसरी पास असलेल्या अन् सालदार म्हणून एका शेतकऱ्याकडे काम करणाऱ्या मजुराने दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्याने या निवडणुकीदरम्यान ना कसला प्रचार केला…. ना कुणाच्या गाठीभेटी घेतल्या. निवडणूक होईपर्यंत हा उमेदवार कुणाला दिसलाही नाही. पण निकालाचे आकडे जाहीर झाले. त्यावेळी उमेदवार बाबू सदू भगरे यांना तब्बल 1 लाख 3 हजार 526 मतं मिळाले आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी 1 लाख 14 हजार मतांच्या फरकाने विजय संपादन केला असला तरी त्यांची मते घटविणारी राजकीय खेळी आता ट्रोल होताना दिसून येत आहे. आडनावातील सामर्थ्यामुळे बाबू भगरे यांना 1 लाखाहून अधिक मते मिळाली आहेत. भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांचा केलेला पराभव लक्षवेधी ठरला. परंतु त्याहून अधिक चर्चेत व प्रकाशझोतात आले ते अपक्ष उमेदवारी करत लाखभर मते मिळविणारे बाबू सदू भगरे.

Loksabha Result l बाबू भगरे राजकीय वर्तुळात ठरतायेत चर्चेचा विषय :

बाबू सदू भगरे हे एकलहरेतील गंगावाडी परिसरात राहणारे असून सालदार म्हणून कामाला आहेत. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी नावापुढे कंसात ‘सर’ ही उपाधी देखील लावली आहे. विशेष म्हणजे त्यांना ट्रम्पेट ही तुतारी सदृश निशाणी मिळाली होती. त्यामुळे आडनावासह चिन्हामुळे त्यांना अधिक मते मिळाल्याची चर्चा आहे.

बाबू भगरे हे मोलमजुरी आणि मासेमारी करतात. तरीही त्यांनी नावापुढे सर म्हणून उल्लेख होता. बाबू भगरे यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र त्यांना तब्बल लाखभर मतं मिळाल्याने बाबू भगरे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषयच ठरले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष बाबू भगरे हे निवडणुकीला उभे होते. मात्र याबाबत त्यांच्या शेजाऱ्यांना देखील यासंदर्भात माहिती नव्हती.

News Title : Babu Bhagre Dindori Loksabha

महत्त्वाच्या बातम्या

अरे व्हा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?

…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा

इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो

अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…