बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपला मोठा धक्का, राजकीय संन्यास घेतो म्हणणारे बाबूल सुप्रियो तृणमूलमध्ये!

नवी दिल्ली | मोदी सरकारच्या काळात मंत्री राहिलेल्या बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी अनेक नेत्यांप्रमाणे बाबुल सुप्रियो यांना मंत्रिपदावरून काढण्यात आलं होतं. त्यानंतर सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा देत आपण राजकारणातून राजकीय सन्यास घेणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियोंनी  राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

बाबुल यांनी आपण राजकारणातून राजकीय सन्यास घेत असल्याचं सांगितंल होतं. याबाबत त्यांनी फेसबुकर पोस्ट केली होती. लवकरच लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा देईल आणि सरकारी निवासस्थान सोडेल, असं बाबुल सुप्रियो आपल्या पोस्टमध्ये म्हणाले. त्यासोबतच दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नसल्याचंही बाबुल म्हणाले होते. मात्र त्यांनी आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, सुप्रियो बाबुल यांना आपल्या मंत्रिपदावरून काढण्यात आलं तेव्हा पश्चिम बंगालमधील भाजपच्या खराब कामगिरीचं किंमत मोजावी लागल्याचं बोललं जात आहे. मात्र आता पश्चिम बंगालमधील राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

शिवसेेनेसोबतच्या युतीबाबत राधाकृष्ण विखे-पाटील यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

“2.5 कोटींहून अधिक लसीकरण झालं, मात्र अचानक एका राजकीय पक्षाला रिअॅक्शन झाली”

सलग दुसऱ्या दिवशीही अनिल देशमुखांच्या मालमत्तेवर आयकर विभागाची छापेमारी

करुणा शर्मांच्या अडचणींत वाढ, आणखी दोन दिवस रहावं लागणार कोठडीत

‘दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार, त्यानंतर…’; सोमय्यांच्या वक्तव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More