पुणे | पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. बाबुराव चांदेरे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचं नाव आहे. बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली आहे.
कारागृहात असलेल्या सराईत गुंडाला सुपारी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाविरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून ही सुपारी नेमकी कोणी दिली याचाही पोलीस शोध घेत आहे.
या प्रकरणात येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला सराईत गुन्हेगार अनिल यशवंते आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत’; या काँग्रेस नेत्याचा राऊतांना इशारा
दिल्लीत बसून शेतीक्षेत्र चालवता येत नाही- शरद पवार
संजय राऊत बिथरले, हादरले आणि घाबरले आहेत- आशिष शेलार
“मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा हे भाजपचे षडयंत्र”
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक; विठोबा भरणे यांचं निधन