Top News महाराष्ट्र मुंबई

‘…आणि आमच्या मुलीकडे तेवढा वेळ नाही’; तीराच्या औषधांवरील सीमा शुल्क हटवण्याची केंद्र सरकारकडे मागणी

मुंबई | 5 महिन्यांची तीरा कामत मुंबईच्या SRCC रुग्णालयात उपचार घेत आहे. तीराला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी हा आजार झाला आहे. या आजारावर भारतात उपाय नाही. तसेच या आजारावरील उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची किंमत आहे तब्बल 16 कोटी रुपये आहे.

16 कोटी रुपये जमा करण्यासाठी तीराच्या आई-वडिलांनी क्राऊड फंडिंगचा पर्याय निवडला. यातून16 कोटी रूपये ही रक्कम जमा झाली आहे. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी काही अडथळे येत आहेत.

अमेरिकेतून हे औषध भारतात आणण्यासाठी कस्टम ड्यूटी अर्थात सीमा शुल्क लागणार आहे. हे सीमा शुल्क माफ करण्यासाठी कामत कुटुंबाने केंद्र सरकारकडे विनंती अर्ज केला आहे.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेमेंट कसं आणि कुठे करायचं? कारण ही रक्कम अतिशय मोठी आहे. असं पेमेंट कधी कोणी केलेलं नाही. त्याला ट्रान्सफर फी लागणार का? डॉलर एक्स्चेंज रेटचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आत्ता नाहीत. पैसे भरले, त्यांनी ते मान्य केलं, औषध कस्टम्समध्ये पोहोचलं तर दुर्मिळ औषधांना सहसा कस्टम्स ड्युटी माफ केली जाते. पण हे औषध त्या ‘लाईफ सेव्हिंग मेडिसिन’च्या यादीत आहे का? हे आम्हाला माहिती नाही. पुढे त्यावर GST भरावा लागणार का? इतक्या प्रचंड रकमेवर 12 टक्के GST लावला तरी मोठी रक्कम होईल, असं तीराचे वडील मिहीर कामत यांनी सांगितलं आहे. ते ‘बीबीसी मराठी’शी बोलत होते.

थोडक्यात बातम्या-

‘काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवलं आहे’; प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

सातवीतील मुलीचे शिक्षकासोबत पलायन; चिठ्ठीत लिहिलं धक्कादायक कारण

“बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे”

“बाळासाहेबांचा पुतळा उभारलात, आता आनंद दिघेंचाही उभारा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या