बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘क्रूर महिला पुन्हा सत्तेत आली’; ‘या’ भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली | पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने आपली सत्ता राखली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेसने 200 पेक्षा जास्त जागा मिळवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता यांचं अभिनंदन केलं मात्र पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी विजयी उमेदवार किंवा पक्षाला शुभेच्छा तर दिल्या नाहीत पण वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

मी ममता बॅनर्जींना शुभेच्छा देणार नाही तसेच जनमताचा आदर करतो, असंही म्हणणार नाही. भाजपला संधी नाकारुन, बंगालच्या जनतेने ऐतिहासिक चूक केली आहे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. भ्रष्ट, असमर्थ, लबाड सरकारला निवडलं असून क्रूर महिला पुन्हा सत्तेमध्ये आली आहे, असं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

कायदा पाळणारा नागरीक या नात्याने लोकशाही देशातील जनतेने घेतलेल्या निर्णयाचे मला पालन करावे लागेल, असंही सुप्रियो यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींपासून राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालमधील विजयाच्या हॅट्ट्रीक बद्दल ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.

दरम्यान, बाबुल सुप्रियो यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कारण त्यांनी विजयी उमेदवार किंवा पक्षाला शुभेच्छा देण्याची परंपरा खंडीत केली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“रडीचा डाव सुरु आहे”; ‘त्या’ निकालाबाबत शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया

“अजित पवारांना गर्व झाला होता, त्यांची टगेगिरीची भाषा होती, तो गर्व मोडून काढला”

नंदिग्राममध्ये ममतांचा खरंच पराभव झाला का?, तृणमूलचं महत्त्वाचं ट्विट

आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- नवाब मलिक

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण…’; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More