बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबीलनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई | बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबील सोशल मीडीयावर सक्रिय असलेला पाहायला मिळतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक पोस्ट शेअर करताना पाहायला मिळतो. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून, बाबीलनं एक मोठा निर्णय घेतल्याचं समोर येत आहे.

बाबीलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आज सकाळी आपला महाविद्यालयीन अभ्यास सोडून देण्याची घोषणा केली आहे. बाबील युकेच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून चित्रपट अभ्यासात ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ ही पदवी घेत होता. आपल्या मित्रांसाठी आणि विद्यापीठासाठी एक भावनिक संदेश लिहून शिक्षण सोडत असल्याची माहिती दिली.

पोस्ट शेअर करत बाबीलनं म्हटलं की, मी तुम्हा सर्वांना खूप मिस करेल मित्रांनो. मुंबईत माझे फक्त 2-3 मित्र आहे. तुम्हा सर्वांनी मला गोठवणा-या त्या ठिकाणी घरासारखी ऊब दिली. मी तिथलाच आहे, असे मला भासवले. खूप खूप आभार आणि प्रेम. आज फिल्म बीए अर्धवट सोडतोय. कारण मी अ‍ॅक्टिंगला माझा पूर्ण वेळ देऊ इच्छितो. गुडबाय युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमिनिस्टर. माझ्या सच्च्या मित्रांना खूप खूप प्रेम.

दरम्यान, दिग्दर्शिका अनविता दत्तच्या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी चित्रपटाद्वारे बाबील अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

थोडक्यात बातम्या – 

दुर्दैवी! पैशांसाठी कुटुंबाला कोरोनाचं औषध म्हणून दिलं विष; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

‘ओबीसी असल्याने मला  महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले….

“संजय राऊतसारख्या भाटाची धनगर समाजाला आवश्यकता नाही”

‘… तो वाघच नसतो त्याला पालतू कुत्रा म्हणतात’; नितेश राणे

डेल्टा प्लस व्हेरिएंटची चिंता करू नका; CSIR शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More