नागपूर | प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना धमकी देणं मनसेच्या अमरावती शहराध्यक्षाला चांगलंच महागात पडलंय. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केलीय. संतोष बद्रे असं या शहराध्यक्षांचं नाव आहे.
संजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यातील वाद जाणीवपूर्वक सुरु असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली होती. त्यावर बद्रे यांनी बच्चू कडू यांना फोन करुन मारहाण करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, फोनची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून प्रहारचे कार्यकर्ते बद्रे यांचा शोध घेत होते. अखेर नागपूरच्या धंतोलीमध्ये बद्रे सापडल्यानंतर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी प्रहारच्या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय.
Comments are closed.