भोपाळ | राजधानी दिल्ली सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना रस्त्यातही मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकरी भेटून बच्चू कडू यांचे आभार मानताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने बच्चू कडू यांनी मोदी सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी दुचाक्या घेऊन शेतकऱ्यांसह दिल्लीच्या दिशेनं प्रयाण केलं आहे.
महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यानंतर बच्चू कडूंना रस्त्यात शेतकरी भेटत आहेत. शेतकऱ्यांसाठी लढा देत असल्यानं ते बच्चू कडूंना आशीर्वाद देखील देत आहेत. असाच एका शेतकऱ्याचा फोटो बच्चू कडू यांनी शेअर केला आहे.
मध्य प्रदेश मधील शेतकरी मायबापाचे आंदोलनास आशिर्वाद…, असं कॅप्शन बच्चू कडू यांनी या फोटोला दिलं आहे. दरम्यान, त्यांनी दिल्लीच्या प्रवासातील अनेक व्हिडीओही त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
पाहा व्हिडीओ-
थोडक्यात बातम्या-
कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचंच, त्यांनी आंदोलन थांबवावं- रक्षा खडसे
सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांना ‘एशियन ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर
“महाविकास आघाडीचे सरकार सांगून पाडणार नाही तर थेट कृती करणार”
‘राज ठाकरेंना निवडणुकीत हवं तसं यश मिळालं नाही, पण…’; शरद पवार
मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार- राम कदम
Comments are closed.