मनसेच्या शहराध्यक्षाला बेदम मारहाण, अपहरणाची योजना फसली!

नागपूर | आमदार बच्चू कडू यांना धमकी देणाऱ्या मनसे शहराध्यक्षाला मारहाण केल्यानंतर त्यांच्या अपहरणाचा डाव होता. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे हा डाव फसला. 

मनसे शहराध्यक्ष संतोष बद्रेंनी बच्चू कडू यांना फोनवरुन धमकी दिल्यानंतर प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्या मागावर होते. अखेर नागपूरच्या जनता चौकात संतोष बद्रेंना प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली तसेच बोलेरो गाडीत घातले. मात्र नागरिकांनी याप्रकाराची माहिती पोलिसांना दिल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करुन संतोषची सुटका केली. संतोषला अमरावतीला नेण्याची प्रहारच्या कार्यकर्त्यांची योजना होती, असं कळतंय. 

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी प्रहारचे नागपूर शहरप्रमुख तुषार पुंडकर यांना अटक केलीय. तर किशोर देशमुख, अविनाश गायसुंगर, निखिल गावंडे आणि सैय्यद अली हे फरार आहेत.