#Video | आमदार बच्चू कडू यांना अटक आणि जामीन

नाशिक | आमदार बच्चू कडू यांना नाशिकमध्ये अटक करण्यात आली होती, मात्र त्यांना जामीन मंजूर झालाय. सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

नाशिक महापालिकेने १९९५च्या अपंग पुनर्वसन कायद्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे प्रहारच्या वतीने पालिकेपुढे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

आमदार बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्तांना भेटण्यासाठी गेले असता त्यांचा राग अनावर झाला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर धावून गेले होते.

पाहा व्हिडिओ-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या