बच्चू कडूंनी दानवेंविरोधात दंड थोपटले; चितपट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

औरंगाबाद | प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. जालन्यात दानवेंना चितपट करुनच परत येणार, असा निश्चय बच्चू कडू यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंविरोधात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला होता. तसेच लोकसभेच्या रिंगणात दानवेंना पराभूत करण्याचा निश्चय देखील त्यांनी केला होता.

जालन्यातून लोकसभा लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता बच्चू कडू यांनी यासंदर्भात तयारी सुरु केली आहे. दानवेंच्या मतदारसंघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मंत्रिमंडळ विस्तारात भाजप शिवसेनेला खूश करणार; उद्धव ठाकरेंचाही होकार

-आशिष शेलारांची मेहनत फळाला; भाजप करणार इच्छापूर्ती?

-एकनाथ खडसेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचा महत्त्वाचा निर्णय?

-शहीद जवानाच्या कुटुंबाला केजरीवालांची 1 कोटींची मदत; कायद्यातही करणार बदल

-हर्षवर्धन पाटलांनी माझ्यासारख्यांची भीती घेऊ नये- दत्तात्रय भरणे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या