बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, पण….- बच्चू कडू

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी वेळोवेळी आपल्या नाराजीची कारणं सांगितली. त्यात त्यांनी आपली नाराजी आमच्या विठ्ठलावर नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या बडव्यांंवर आहे असं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी सर्वांना घरवापसीची साद घातली. परंतु त्यांचं कोणी ऐकलं नाही.

आम्ही सुरतला शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गेलो नव्हतो, तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात समेट घडून येईल का? हे पाहण्यासाठी गेलो होतो, असं कडू म्हणालेत. मुंबईहून सुरतला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. पण त्यांचा मला समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. मग आम्ही शिंदे आणि ठाकरेंमध्ये समन्वय साधण्यासाठी सुरत गाठलं. असा खुलासादेखील यावेळी कडूंनी केला आहे.

सुरुवातीला समेट घडवून आणण्याची आमची इच्छा होती. पण नंतर नंतर सुरतला आमदार वाढत गेले आणि कोणाचीच समेटाची मानसिकता राहिली नाही. सत्तास्थापनेनंतरच तेथून निघण्याची खूणगाठ प्रत्येकाने बांधली. दरम्यान, सगळेच आमदार बंडखोरी करतात, असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांची पाठराखण केली. बंडखोरी प्रत्येकात असली पाहिजे, बंडखोरीच माणसाला जीवंत ठेवते, असंही ते म्हणालेत.

पुढे बोलताना कडू म्हणाले, एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आपण उद्धव ठाकरेंची भट घेऊन त्यांच्या सरकारमध्ये आलो होतो. आम्ही मविआत शिंदेंच्या मार्फतच गेलो होतो. उद्धव ठाकरेंसारखा सात्विक माणूस नाही, त्यांचा स्वभाव अतिशय निर्मळ आहे. पण आजूबाजूच्या लोकांनी त्यांना घेरलय. ज्या ताकदीने ते मातोश्रीवरुन काम करत होते, त्याच ताकदीने त्यांनी वर्षावरुन कामं केली नाहीत, अशी खंतही बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

काँग्रेसचे ते सात आमदार अडचणीत; हायकमांड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना इशारा, म्हणाले ‘हिंमत असेल तर…’

“50 कोटी पचणार नाहीत, गुलाबरावचा जुलाबराव होईल”

मोठी बातमी! शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत

“आम्हाला संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, त्यांच्याकडे आज ना पक्ष आहे ना चिन्ह”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More