अमरावती महाराष्ट्र

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना!

अमरावती | राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध केला आहे. त्यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू दुचाकीवरून दिल्लीकडे रवाना झालेत. ते अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीकडे निघाले आहेत.

केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. हे कृषी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

केंद्राने कृषी कायदे लागू करण्याआधी शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. केंद्र सरकारने हे कायदे लादले आहेत, असा आरोप शेकऱ्यांकडून केला जातोय. याविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणाचे शेतकरी आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.

महाराष्ट्रातही प्रदेश काँग्रेसने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यानंतर बच्चू कडू यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रताप सरनाईकांनी चौकशीला हजर होण्यासाठी ‘ईडी’कडे मागितली इतक्या दिवसांची मुदत

गाडी घेताना एक रुपयाही भरण्याची गरज नाही; या कंपनीनं आणलीय भन्नाट ऑफर!

रेखा जरे हत्याप्रकरण; आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

पुण्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा; पुणे महापालिकेनं घेतला हा मोठा निर्णय!

लग्नाच्या 3 दिवस आधी मित्रानं तरुणाचं गुप्तांग कापलं; वाचा नेमकं काय घडलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या