हिंगोली | आमदार बच्चू कडू(Bacchu Kadu) कायम विरोधी पक्षनेत्यांवर टीका करत असताना दिसतात. आता तर त्यांनी स्वत:च्याच सरकारवर निशाणा साधत घणाघाती टीका केल्याचं पाहायलं मिळतंय. एकेकाळी शिंदे- फडणवीस(Shinde-Fadnavis) सरकार सोबत असलेले बच्चू कडू आता याच सकारच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसत आहेत.
बच्चू कडू यांनी भाजपच्या(BJP) विरोधात हल्लाबोल केला आहे. प्रहार संघटनेने हिंगोलीत दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केलं होतं. त्यावेळेस माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारला अफझलखानाची उपमा दिली. “भाजप मित्र म्हणून जवळ घेतो आणि अफझलखानासारखी मिठी मारतो,” अशी खोचक टीका करत भाजपला धारेवर धरलं.
बच्चू कडू यांनी थेट भाजपवरच निशाणा साधण्यास सुरुवात केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू म्हणाले की, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) हे सरकारमध्ये सामील होण्यास सांगतात. त्यानंतर ते फोन करतात आणि नंतर वेगळीच भूमीका मांडतात.
वाघ नखांवर बच्चू कडू यांनी वक्तव्य करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर(Aditya Thackeray) निशाणा साधला. वाघ नखे हा काय मुद्दा आहे काय? ज्यांना नखे राहिली नाही, त्यांनी त्यावर बोलावं हे आश्चर्य आहे. आधी स्वत:ला किती नखं राहिली ते पाहावं, असा टोला बच्चू कडू यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
थोडक्यात बातम्या-
“या माणसाने देशाचं वाटोळं केलं, टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही”
मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्लीत
“संजय राऊत खोटारडा, घर चालवण्यासाठी शिंदे साहेबांकडून पैसे घ्यायचा”