मुख्यमंत्री फडणवीस बँकांचे दलाल आहेत का?- बच्चू कडू

यवतमाळ | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बँकांचे दलाल आहे का ? उरलेली रक्कम भरा तेव्हाच कर्जमाफी देऊ, अशी जुलमी अट लावणारे शासन आणि मुख्यमंत्री यांनी बँकेच्या वसुली अधिकाऱ्याची भूमिका वठविणं सुरु केलंय का? अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.

यवतमाळमध्ये आयोजित शेतकऱ्यांच्या शवयात्रेत ते बोलत होते. दरम्यान, शवयात्रेची धास्ती घेऊन पोलिसांनी आंदोलनप्रमुखांसह शेतकऱ्यांची सकाळपासूनच धरपकड केली, याचाही त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या