बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारच्या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू म्हणतात…

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी कमी आहे. यावर निर्णय व्हायला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 2 लाख रुपये म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ झाल्यासारखंच आहे, असंही ते म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही9’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सरकारच्या कर्जमाफीमुळे शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्ती केली आहे. कर्जमाफीमुळे सात बारा कोरा करण्याचा शब्द पूर्ण होत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकऱ्यांना आता तातडीची मदत अपेक्षित होती, अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं आहे, उद्धव ठाकरेंनी 25 हजार हेक्टरीची मागणी केली होती, पण अद्याप एक पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More