मुंबई | अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय. मात्र 15 दिवस उलटून गेलेत तरी अजून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
दरम्यान शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यास तांत्रिक कारणाने विलंब होत असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलंय.
बच्चू कडू म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नक्कीच मदत मिळणार आहे. सध्या काही तांत्रिक कारणांमुळे ही मदत मिळण्यास विलंब होतोय.
दरम्यान दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. सध्या परिस्थिती कठीण असून राज्याकडेही पैसा नाहीये. मात्र अशा स्थितीतही सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचं, ते म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBचं जेतेपदाचं स्वप्न यंदाही भंगलं; हैद्राबादची बंगळूरूवर 6 गडी राखत मात
स्वत:ला अटक करणार का?;निलेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”
नितीशकुमार यांनी दिले निवृत्तीचे संकेत, म्हणाले…
पुण्यात महाविकास आघाडीला सर्वात मोठं यश; भाजपला मोठा धक्का!
Comments are closed.