Top News

रावसाहेब दानवेंना सर्वात मोठा धक्का; बच्चू कडूंनी घेतला हा निर्णय

जालना | आमदार बच्चू कडू यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापुढे नवं संकट निर्माण केलं आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना पाठिंबा दिला आहे.

मी कधीही काँग्रेसच्या बाजूने नव्हतो किंवा असणारही नाही. मात्र रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी मी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना शिव्या देणाऱ्या रावसाहेब दानवेंना जिंकू देणार नाही, ते जिंकले तर आमची इज्जत पुन्हा खाली गेल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांनी आधी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात दंड थोपटले होते. मात्र आता त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिल्याने दानवेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-सभेत काळा मोजाही न चालणारे सरकार घाबरले आहे- सुप्रिया सुळे

-मला ‘मुन्नाभाई’ म्हणून हिणवता मात्र तुम्ही तर ‘भाई’ आहात- सुजय विखे

-प्रकाश आंबेडकरांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणं वृद्धास पडलं महागात

-प्रीतम मुंडे यांच्यापेक्षा जास्त मतांनी डॉ. सुजय विखेंना निवडून द्या- पंकजा मुंडे

-जिथं कायदे बनतात तिथं कायदे मोडणाऱ्यांना पाठवणार का?; पंकजा मुंडेंचा सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या