Top News अमरावती

‘माफी मागा अन्यथा तोंड काळं करु’; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

अमरावती | देशातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा पेटला आहे. मागील काही दिवसांपासून पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यातील शेतकरी दिल्लीत सहा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी या शेतकऱ्यांनी  दुसरीकडे जाऊन मरावं, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. यावर बच्चू कडू आक्रमक झाले असून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रतनलाल कटारीयांनी तात्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं राज्यमंत्री बच्चू कडु यांनी म्हटलं आहे.

रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. आणि त्यांनी शेतकऱ्यांबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरायची भाषा वापरत असाल तर मग आम्ही तुम्हाला मारायसाठी यायचं का?, असा सवालही बच्चू कडू यांनी केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीसाठी पाठींबा देता येत नसेल तर सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही तर मारण्याची भाषा करत असाल तर आम्हाला आंदोलन सोडून तुम्हाला कुठं पाठवायचं हे ठरवावं लागेल, असं बच्चू कड़ू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

2024 ला मी पुन्हा येईल- डोनाल्ट ट्रम्प

…तर उत्तर प्रदेशात मायानगरी आपोआप निर्माण होईल; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांना टोला

“अमेरिका जगाला एकत्रही ठेवू शकला नाही, जगाचे नेतृत्व करण्यास भारत सक्षम”

मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या