मुंबई | बंगलेवाटपावर मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. प्रत्येकालाच आवडीचे खाते तसेच पसंतीचा बंगला हवा आहे. पण सध्या तसं होताना दिसत नाही. यात प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्मशानभूमीच्या शेजारी बंगला दिला गेल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या अपंग आणि रुग्णांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय तसेच मंत्रालया शेजारील बंगल्याची मागणी केली होती. मात्र, तसे झालेलं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज आहेत.
शुभ अशुभ यापेक्षा अपंगांना सोयीचा असणारा बंगला व कार्यालय हवे होते. तरीही सध्या मिळालेले कार्यालय स्वीकारून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक वेळ देणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक विधानभवनात कार्यालय आणि मलबार हिल येथील स्मशानाजवळील रॉकी हिल 1202 हा फ्लॅट दिला असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिग बातम्या-
अखेर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिपदाचा तिढा सुटला, ही आहे संभाव्य यादी!
शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया…
महत्वाच्या बातम्या-
CAAवर पहिल्यांदाच बोलला कॅप्टन कोहली; म्हणाला… – https://t.co/BwrQiYcG48 @imVkohli @BCCI @ICC #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 4, 2020
हिंमत असेल तर स्वतंत्र लढून दाखवावं; चंद्रकांत पाटलांच खुलं आवाहन – https://t.co/OZIh585mlW @ChDadaPatil @BJP4Maharashtra @INCMaharashtra @NCPspeaks #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 4, 2020
“राहूल गांधींना CAA वाचता येत नसेल तर इटालियनमध्ये भाषांतरीत करून देतो” – https://t.co/RHKFaIYT5v @AmitShah @RahulGandhi @BJP4India @INCMaharashtra #म
— थोडक्यात (@thodkyaat) January 4, 2020
Comments are closed.