Bacchu kadu | राज्यभरात सध्या लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा केली. त्यामुळे सध्या महिला वर्ग जाम खुश आहे. राज्यभरात योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. मात्र, या योजनेवर अर्थखात्यानेच आक्षेप घेतला होता, ही बाब आता समोर आली आहे. (Bacchu kadu )
या योजनेवरून महायुतीमध्ये वाद सुरू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. राज्यावर आधीच भरमसाठ कर्ज असताना या योजनेसाठी वर्षाला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा 8 लाख कोटी रुपयांच्या आसपास जाईल, याकडे लक्ष वेधत ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे अर्थ विभागाचे म्हणणे होते.
बच्चू कडू यांचा सरकारला सल्ला
आता यावरच प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी भाष्य केलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
तसंच योजनेसाठी राज्यपालांचा तब्बल 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. राज्यपालांना 40 एकरचा बंगला कशाला पाहिजे?, हा बंगला विकला तर तब्बल 1 लाख कोटी मिळतील, असं बच्चू कडू (Bacchu kadu ) म्हणाले.
कष्ट करणाऱ्यांसाठी देखील योजना आणावी
इतकंच नाहीतर राज्यपालांसाठी असलेल्या बंगल्याची 40 एकरातील जागा विकून येणाऱ्या पैशातून कष्ट करणाऱ्यांसाठी चांगली योजना जाहीर करा, अशी मागणी देखील बच्चू यांनी केली आहे. यातून त्यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
राज्यपालांचा एवढा मोठा मुंबईतील 40 एकरचा बंगला विकायला हवा आणि त्यांना दुसरा एखादा चार-पाच मजल्यांचा बंगला बांधून द्यावा. आम्ही ती जागा बघितली आहे. त्या जागेचे देखील चांगले पैसे येतील, असा सल्ला आम्ही दिलाय, असं बच्चू कडू (Bacchu kadu ) म्हणाले आहेत.
News Title – Bacchu kadu said sale out the 40 acre bungalow of governor
महत्त्वाच्या बातम्या-
“शरद पवार दंगली घडवण्याचं काम करत आहेत”; ‘या’ नेत्याचा थेट आरोप
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक”; संजय राऊतांची टीका
पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचं थैमान; खडकवासलातून विसर्ग वाढवला
पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढला; आणखी 9 रुग्ण आढळल्याने खळबळ
“..ते सगळं ऐश्वर्याला कधीच मान्य नव्हतं”; सलमान-ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा समोर