मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला असून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये एक शेतकरी रडताना दिसत असून त्याला रडण्याचे कारण विचारले असता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे तो सांगतो. कर्ज उरावर बाळगताना झालेल्या वेदना आणि आता कर्जमाफ झाल्यानंतर शेतकऱ्याचे पानावलेले डोळे सर्व काही सांगून जात आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल होत आहे. एसटीमध्ये रडणाऱ्या व्यक्तिला कारण विचारल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत बोलला 2 लाख कर्ज होते. आज माफ झाले धन्यवाद महाविकास आघाडी सरकार.., असं ट्वीट बच्चू कडू यांनी केलं आहे.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफी संदर्भात आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ वायरल होत आहे, एसटी मध्ये रडणार्या व्यक्तिला कारण विचारल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत बोलला २ लाख कर्ज होते आज माफ झाले
धन्यवाद महाविकास आघाडी सरकार… @OfficeofUT @AjitPawarSpeaks @dadajibhuse @AUThackeray pic.twitter.com/iNSBnKkDdk— BACCHU KADU (@RealBacchuKadu) March 4, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
भाजपच्या नगराध्यक्षाला 5 कोटींच्या घोटाळा प्रकरणात अटक
अमृता फडणवीसही सोशल मीडिया सोडणार नाही; टाकलं मोदींच्या पावलावर पाऊल!
महत्वाच्या बातम्या-
माझ्यापेक्षा माझ्या बायकोला पगार जास्त आहे- देवेंद्र फडणवीस
पुढची 5-10 वर्ष अशीच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहित राहा- उद्धव ठाकरे
काय साहेब?, लोक मुर्ख वाटले का?; विशाल दादलानीने भाजपला फटकारलं
Comments are closed.