बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला…”, ‘या’ मंत्र्याची कंगनाविरोधात रोखठोक भूमिका

मुंबई | कंगना रनौतने काही दिवसांपुर्वी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते, त्यातच भारताला 1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य हे भिकेने मिळालं, असं वक्तव्य तिने केलं होतं.

कंगनाने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यमंत्री बच्चु कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कंगनाला देशद्रोही घोषित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणाऱ्या कंगना रनौतला देशातून तडीपार करण्याची मोठी मागणी करत बच्चू कडू यांनी कंगनाच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

कंगना रनौतने आपल्या देशाच्या सर्वच स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केला आहे. त्यामुळे ती जोपर्यंत नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला या देशात स्थान देण्यात येऊ नये, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच बच्चू कडू यांनी रोखठोक भूमिका मांडल्याने या प्रकरणात पुढे काय होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, या देशात कंगना, मंदीर, मशिद या विषयांवर चर्चा घडवली जाते. पण रोजगार, गरीबी, शेतकरी व कष्टकऱ्यांच्या अडचणी या मुद्यांवर चर्चा होत नाही, हे अत्यंत दुर्देवी असल्याचं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बोलून दाखवलं आहे. कंगनाच्या त्या वक्तव्यामुळे ती आता चांगलीच वादात सापडली आहे.

थोडक्यात बातम्या

…तर इतर सर्व महामंडळातील कर्मचारीही विलीनीकरणाची मागणी करतील

लोणावळ्याच्या तन्वी बंगल्यात पोलीस पोहोचले अन् समोर जे दिसलं ते पाहून हादरले

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करणार नाही?, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

वयाच्या 100 व्या वर्षी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मालवली

आता आधी पैसे मगच वीज, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More