अमरावती | अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राज्यसभा(RAJYASABHA) निवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडल्याने 9 तासांनी निकाल लागला. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावेळी संजय राऊतांनी अपक्षाला दोष दिल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
काही अपक्षांनी दगाबाजी केली असली तरी सगळं खापर त्याचावर फो़डणं योग्य नाही, असं ते म्हणाले. ते अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसने (Congress) अतिरीक्त मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तसे प्रयत्न तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी झाले नाही. सुहास कांदेचं मत बाद होणं, तसेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनाही मतदानासाठी परवानगी न मिळणं ही कारणे सुद्धा त्यांनी लक्षात घ्यायला हवी, असं वक्तव्य त्यांनी पत्रकारांशी बोलतानं केलं.
शरद पवारांनी फडणवीसांच कौतुक केलं. याबद्दल विचारलं असता या कौतुकामागे असलेलं राजकारण हा संशोधनाचा विषय असल्यांच ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा, म्हणाले…
राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज
“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”
‘अब देवेंद्र अकेले ही नहीं, सारी कायनात उनके साथ है’- अमृता फडणवीस
“आमचे 106 त्यांच्या 170 वर भारी; तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”
Comments are closed.